बातम्यामहाराष्ट्र

नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच – चंद्रकांत पाटील

File Photo

पुणे (वास्तव संघर्ष) – नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच आहे . त्यानुसार केंद्र सरकारने हा कायदा पास केला आहे यानुसार नागरिकत्व देण्यात येणार आहे , कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही , असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात सांगितले

कोथरूडमधील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा कायद्याविषयी आपली भूमिका मांडली . पाटील पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेमुळेच सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला .

तसेच , देशातील अल्पसंख्याक समाजाच्याहिताचे रक्षण झाले . मात्र , पाकिस्तान , अफगाणिस्तान , बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू , शिख , बौद्ध , जैन , ख्रिश्चन यांच्या हिताचं रक्षण झाले नाही . त्यामुळे त्यांना तो देश सोडून भारतात आश्रयाला यावे लागले , त्या लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारताचे नागरिकत्व देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला . यामध्ये कुणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही . देशात या कायद्यावरून जे आंदोलन होत आहेत , ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

Share this: