क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :मेव्हण्याने कोयत्याने वार करून बहिणीच्या पतीचा केला खून

पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात बहिणीच्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून होणारी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हण्याने कोयत्याने वार करून बहिणीच्या पतीचा खून केला . ही धक्कादायक घटना रविवारी ( दि .९) रात्री भोसरी परिसरात घडली .

मोहन बाबुराव लेवडे ( वय४५ ) असे खून झालेल्याचे नाव आहे . याप्रकरणी मृतांची पत्नी नंदा मोहन लेवडे ( वय ३४ ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार , विष्णू मुंजाजी जगाडे ( वय ३० ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी विष्णू हा फिर्यादी नंदा यांचा भाऊ आहे . नंदाचे पती मोहन यांचे बाहेर अनैतिक संबंध आहेत , असा संशय विष्णूला होता .

नंदा आणि मोहन यांच्यामध्ये वारंवार भांडण होत होती . बाहेर असलेल्या अनैतिक संबंधामुळे ही भांडणे होत असल्याचा संशय विष्णूला होता . त्यामुळे ही भांडणे सोडविण्यासाठी विष्णू मागील काही दिवसांपूर्वी बहीण नंदा यांच्या घरी आला होता . रविवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले . जेवण झाल्यानंतर विष्णू आणि मोहन यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाले . त्यातून चिडलेल्या विष्णूने लोखंडी कोयत्याने वार करत मोहन यांचा खून केला . पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे . विष्णू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत .

Share this: