क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

१४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोसरी (वास्तव संघर्ष)-व्यवसायासाठी घेतलेले १४ लाख ८५ हजार रुपये परत न करता त्याचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना ११ नोव्हेंबर २०१९ च्या दरम्यान धावडेवस्ती भोसरी येथे घडली . ज्ञानेश्वर वामनराव कोद्रे ( वय ४३ रा . चक्रपाणी वसाहत , भोसरी ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे .

आनंद पोपटलाल शिंगवी ( वय ४५ , रा . इंद्रायणीनगर , भोसरी ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या Herms I ticket ( the smart shop ) या मनी ट्रान्स्फर अॅपवरून आरोपी ज्ञानेश्वर याने व्यवसायासाठी १४ लाख ८५ हजार रुपये विश्वासाने ट्रान्सफर करून घेतले . घेतलेले पैसे दुस – या दिवशी परत करणे अपेक्षित असताना पैसे परत न करता स्वतःकडेच ठेवून त्याचा अपहार केला . तसेच आरोपीने स्वतःचा मोबाईल फोन बंद करून कोणाला काहीही न सांगता निघून गेला . याबाबत विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भोसरी पोलीस तपास करीत आहेत .

Share this: