अरे देवा! पुण्यात सोळा तासात आढळले दोनशे कोरोना रुग्ण
पुणे(वास्तव संघर्ष ) : पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात एकून रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत . तर 268 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . जिल्हयात अॅक्टीव रुग्ण 1 हजार 383 असून , कोरोनाबाधीत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत . शहर जिल्ह्यात कोरोनाचा चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे . तर, कोरोनामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी घेतला आहे .
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे ही समाधानाची बाब आहे . आतापर्यंत पुणे विभागातील ३०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागातील १८ हजार ५९ नमून्यांची तपासणीही पूर्ण झाली आहे. यापैकी १६ हजार २१२ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर १ हजार ९०५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पुणे विभागात आतापर्यंत ९९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७७ रुग्ण गंभीर आहेत. इतर उर्वरीत रुग्ण निरीक्षणाखाली आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.