खाजगी डाॅक्टरांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी दूर करा – विरोधीपक्षनेते नाना काटे
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी डॉक्टरांनी शासनाच्या आव्हानास प्रतिसाद देत त्यांनी त्यांचे दवाखाने चालू केले आहेत, परंतु त्यांना व्यवसाय करताना काही अडचणी येते आहेत. त्यावर खाजगी डॉक्टरांच्या फँमिली फिजिशियन असोशियन या संस्थेच्या डॉक्टरांनी आज दिनांक ११/०५/२०२० रोजी शिष्टमंडळास विरोधी पक्षनेता विठ्ठल (नाना) काटे माजी नगरसदस्य प्रशांत शितोळे यांच्या मा. आयुक्तांची भेट घेऊन डॉक्टरांच्या अडचणी विषयी चर्चा केली. यावेळी खाजगी डॉक्टारांनी कोरोना बाधित डॉक्टाराचे नाव,पत्ता व त्यांच्या व्यवसायाचे ठिकाण प्रसिध्द करण्यात येऊ नये, कोरोना बाधित खाजगी डॉक्टरांना सरकारी रुग्णालयामध्ये सन्मानाची वागणूक देण्यात यावी शक्य असल्यास त्याना राखीव जागा ठेवाव्यात., खाजगी डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही त्यांना विमा संरक्षण पुरविण्यात यावे.
मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन यांना योग्य तो समन्वय साधून खाजगी डॉक्टरांना कोरोना संबंधित सुचना कराव्यात म्हणजे गोंधळ होणार नाही, काही खाजगी डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये कॉरटाईन केले जाते तसे न करता त्यांना घरीच कॉरटाईन करण्यात यावे., कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णास पुढील उपचार अथवा तपासणी साठी सरकारी रुग्णालयात जाणेबाबत सल्ला दिला असता बहुतेक रुग्ण जात नाही व अशा रुग्णांची माहिती पालिका प्रशासनास दिल्यास संबंधित रुग्णांचे नातेवाईक त्या खाजगी डॉक्टारास शिवीगाळ करतात अशा गोष्टी गोपनिय ठेवल्या जाव्यात,तसेच डॉक्टरांसाठी अत्यावश्यक असणारे पी.पी.ई किट N95 मास्क, सँनिटायझर या गोष्टी सतत वापराव्या लागत असल्यामुळे रास्त दरात मिळाव्यात. अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आला.
विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे व माजी नगरसदस्य प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मा. आयुक्त यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी नाना काटे व प्रशांत शितोळे वैद्यकिय विभागाचे डॉ.पवन साळवे उपस्थित होते नाना काटे व प्रशांत शितोळे यांनी डॉक्टरांच्या मागण्याबाबत योग्य ती साधक बाधक चर्चा करुन मागण्या मान्य करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्यास मा. आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या बाबत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच पालिका प्रशासन व खाजगी डॉक्टर्स मिळून योग्य समन्वय साधून शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सल्ला दिला.