माझं पिंपरी -चिंचवड

फेसबुक अकाउंटद्वारे अश्लील मेसेज पाठविणा-याला पोलिंसांनी केली अटक

पुणे – काञज याठीकाणी राहणारा आरोपी संदीप देवकर असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.  याप्रकरणी संजय सुखदेव जगताप (रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी संजय यांना सचिन देव या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. संजय यांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर त्या प्रोफाईलवरून संजय यांना आक्षेपार्ह आणि अश्लिल मेसेज येऊ लागले. या मेसेजेसला वैतागून अखेर संजय यांनी पुणे सायबर क्राईम सेल येथे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या तक्रारिची चौकशी करून आरोपीची माहिती काढली आणि अश्लिल मेसेज करणा-या संजय देवकर याला तांत्रिक माहितीच्या आधारे अटक करून सहकारनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

ही कामगिरी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस उपनिरीक्षक अनिता पवार, पोलीस शिपाई पूजा डहाळे, सोमनाथ भोरडे यांनी केली आहे.

Share this: