पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोनाची लागण
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचे आज (सोमवारी) रात्री रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत पाच नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाने लोकप्रतिनिधी, महानगरपालिका कर्मचा-यांनाही विळखा घातला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोठी मदत केली होती. जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.
तसेच महापालिकेतील विविध बैठकांना देखील ते हजर राहत असत. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता.त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.