सहा महीने कोरोना काळातील मिळकत कर माफ करा-अण्णा जोगदंड

पिंपरी (वास्तव संघर्ष) :मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने मा.मुख्यमंत्री,उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यचे मुख्य सचिव,संजय कुमार,नगरविकास अप्पर सचिव, प्रविण परदेशी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालीकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्धारे मागणी केली आहे.

जागतिक महामारी आल्यामुळे केंद्र सरकारने 25 मार्च पासून संपूर्ण देश लाँकडाउन केला. रूग्णांची  वाढती संख्या पाहून वारंवार केंद्राने व राज्य सरकारने लाँकडाउन वाढवला.व अजून ही पुर्णपणे लाँकडाउन काढलेला नाही.गेले सहा महीने नागरीक लाँकडाउन मध्ये जिवन जगत आहेत.आपल्या शहरातही कोरोना आजाराने थैमान घातले आहे, शेकडो नागरीकिचे जीव ही गेले आहेत. गोरगरीबांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकाच्या नोकऱ्या गेल्या आहेत.काही नागरिक गावाकडे गेले आहेत.

लहान लहान व्यवसायीकावर तसेच असंघटीत कामगरावर उपासमारीची वेळ आली आहे.बऱ्याच आस्थापना मध्ये आजहीे कामगारांची कोरोनाच्या नावाखाली पिळवणूक चालू आहे .यातच महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच भरमसाठ लाईट बीलामुळे नागरीक हैराण झाले आहेत.उद्योगनगरीत लघुउद्योग व्यवसायिक भयभीत झाले आहेत.
अशा वेळी पालीकेने सहा महिने काळातील मिळतकर माफ करावा ,व पालिकेचे  जे आर्थिक नुकसान होणार आहे त्यासाठी राज्य शासनाने पालीकेस मदत करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यानी  मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवाना ,व आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्याक्षा संगिता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, गजानन धाराशिकर,आळंदी सचिव रवी भेंनकी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this: