आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

उपचाराअभावीच माझ्या भावाचा मृत्यु ;पञकार पांडुरंग रायकर यांच्या बहिणीचा आरोप

पुणे (वास्तव संघर्ष) : ‘ टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी ४२ वर्षीय पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला , असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत . अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे . पांडुरंग रायकर यांचा जीव गेला , हे निश्चित दु : खदायक आहे . या प्रकरणाची चौकशी केली जाईल . पुणे जिल्हाधिकारी , पालिका आयुक्तांना तसे सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली . पुण्यात लक्ष दिलं जातं आहे , पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं आहे . ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे , हे खरे असले , तरी बेड कमी पडत असतील तरी ते वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे . अँटिजन टेस्ट केल्या जातात त्या आयसीएमआरच्या गाईडलाईन्स आहेत , असे राजेश टोपे यांनी सांगितले .

तसेच बुधवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना रायकर यांच्या बहीणीने गंभीर आरोप केले आहेत त्या म्हणाल्या, कार्डियक एम्बुलेंस वेळेवर न आल्याने माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. एम्बुलेंस अहमदनगरवरून पुण्याला आणण्यात आले त्यामुळे त्याच्यावर लवकर उपचार सुरू करण्यात आले नाही त्यांनी हे पण सांगितले की जंबो अस्थाई हॉस्पिटलमध्ये देखील पत्रकार पांडुरंग रायकर वर चांगला उपचार करण्यात आला नाही. त्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यु झाला आहे.

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जात आहे . कोव्हिड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल . ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत . विम्याची मदत मिळवून द्यायचा त्यांना प्रयत्न करु , असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले आहे .

Share this: