पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर;शहरात एकाच दिवशी 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. शहरात एकाच दिवशी 41 रूग्ण मुत्युमुखी पडले आहेत. महापालिकेने शुक्रवारी रात्री दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शहरातील 9 हजारच्या वर सक्रिय रुग्णांवर पालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तसेच शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 61 हजार 231 वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा सर्वात पहीला रुग्ण 10 मार्च रोजी आढळला होता. तेव्हापासून शहरातील 61 हजार जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 48 हजार 923 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 1265जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.