पिंपरी चिंचवड शहरातील व्यायामशाळा उद्या पासून होणार सुरू ;महानगरपालिकेने दिले अधिकृत आदेश
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील लॉकडानमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या व्यायामशाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील व्यायामशाळा सुरू करण्यास अधिकृत आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर करण्यात केला आहे. यामध्ये दसरा म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून व्यायामशाळा सुरु करु शकता असे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच करोना प्रतिबंधात्मक नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन करून राज्यातील व्यायामशाळा (जिम, फिटनेस सेंटर्स) सुरू करण्यास शनिवारी परवानगी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आदेशात काय म्हटलं आहे
संपूर्ण राज्यभरात २५ ऑक्टोबरपासून जिम सुरु करण्यासाठी परवानगी देत आहोत. पिंपरी चिंचवड शहरातील व्यायामशाळा या राज्य आणि केंद्रीय आरोग्य विभागाने आखून दिलेल्या नियम लक्षात घेवून सुरू करण्यात याव्या . करोनासंबंधित सर्व नियमांचं पालन केलं जावं. ही परवानगी कंटेनमेंट झोनबाहेरील जिमसाठी आहे.
सर्वसाधारण अनिवार्य सूचना
सामान्य प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी कोविड -19 चा धोका कमी करण्यासाठी ( व्यायामशाळा कर्मचारी , सभासद , अभ्यागंत इ . ) यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे . त्या अनुषंगानेखालील नियम पाळून व्यायामशाळा सुरू करणेकामी परवानगी देणेत येत आहे . १. सर्वांनी किमान 6 फूट शाररिक अंतरराखले पाहिजे . 1 २. व्यायामा दरम्यान मास्क चा वापर प्रत्येक वेळी अनिवार्य आहे . व्यायामशाळेत व्यायाम करताना N 95 मास्क वापरामुळे श्वास घेण्यात अडचण येऊ शकते . त्यामुळे सर्जिकल मास्क किंवा मल्टी लेअर कापडाचे मास्क , घट्ट विणलेल्या कापसाचे मास्क जे सुरक्षितपणे नाक , तोंड आणि हनुवटी या भागावर घट्टपणे बसतील अशा मास्कचा समावेश करावा . व्यायाम करताना सिंगल लेयर कपड्याचे मुखपट्टी / मास्क देखील वापरू शकतात . ३. जरी हात खराब झालेले नसतील तरीही साबणाने ( किमान 40-60 सेकंद ) वारंवार हात धुणे आणि २० सेंकदापर्यंत अल्कोहोल – आधारित हँड सॅनिटायझर्सचा वापरणे हे शक्य असेत तेव्हा करावे . ४. खोकताना / शिंकताना रूमाल , टिश्यू पेपर इ.चा वापर तोंड झाकण्यासाठी न चुकता करावा . तसेच खोखताना किंवा शिंकताना हाजाच्या कोपराचा बापर करावा व रूमाल , टिश्यू पेपर यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी . ५. आरोग्याचे स्व – परीक्षण करणे आणि कोणत्याही आजाराची नोंद महापालिकेच्या हेल्पलाईनला कळविणे . ६. परिसरात धुंकण्यास कडक मनाई करणेत यावे . ७. आरोग्य सेतु अॅप वापरण्याबाबत सर्वांना सल्ला देण्यात यावा .
व्यायामशाळा उघडल्यानंतर प्रवेशद्वार
१. प्रवेशद्वारावर थर्मल स्किनिंग व हँण्ड सॅनिटायझ करणे बंधनकारक आहे . फक्त लक्षणे नसणा – या व्यक्तींना ( कर्मचाऱ्यांसह ) आवारात परवानगी राहील . ३. मुखपट्टी / मास्क वापरणा – या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा . ४. सर्व सदस्य , अभ्यागत आणि कर्मचारी यांनी आरोग्य सेतू अँप वापरणे आवश्यक आहे . ५ . COVID – 19 विषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स / स्टैङिज इ . स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावाव्यात . कोविड -19 च्या प्रतिबंधक उपायांवर जागरूकता पसरविण्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स चा वापर करावा . ७. रांगेत किमान 6 फूट अंतर सुनिश्चित करने ८. पार्किंग लॉटमध्ये , कॉरिडॉरमध्ये आणि लिफ्टमध्ये – योग्य पद्धतीने गर्दीचे व्यवस्थापन करावे . व्यायामासाठी परवानगी देण्यासाठी स्वतंत्र टायमिंग स्लॉटसह सदस्य / अभ्यागत यांचे वेळ निश्चित करणे . आवार आणि उपकरणांचे पुरेसे शारीरिक अंतर आणि निर्जंतुकीकरण करणे . १०. सभासद आणि अभ्यागतांच्या चेक – इन आणि चेकआउट वेळेचा तपशील नोंदविला जाणे आवश्यक आहे ( नाव , पत्ता आणि फोन नंबर )