बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत महिला बालकल्याण , मागासवर्गीय , दिव्यांग कल्याणकारी आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून महानगरपालिका हद्दीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे . या योजनांसाठी अर्ज वाटप आणि स्विकृती दि . २७ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत होणार आहे . अर्ज वाटप आणि स्विकृती महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी होईल .

सर्व अर्ज मोफत मिळणार असून या अर्ज स्विकृतीवेळी २० रुपये शुल्क आकारण्यात येईल . महिला बालकल्याण योजनेअंतर्गत विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य , इयत्ता १० वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी अर्थसहाय्य , इयत्ता १० वी नंतर ( आयटीआय मधील ) मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदाविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य , दीड वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य , मुलगी दत्तक घेणा – या दाम्पत्यास अर्थसहाय्य या योजनांचा समावेश आहे . अस्तित्व पुनर्वसन योजनेअंतर्गत पीडीत महिलांना अर्थसहाय्य केले जाईल . पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अथवा पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यास दुस – या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा – या महिलेस अर्थसहाय्य , रामभाऊ म्हाळगी मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य योजना , परदेशातील उच्चशिक्षण / अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतींना अर्थसहाय्य , १० वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचतगटांना अर्थसहाय्य , इयत्ता १२ वी नंतर वैद्यकीय ( MBBS , BAMS , BHMS , BDS , BUMS ) , MBA आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणा – या युवतींना अर्थसहाय्य अशा योजनांचा समावेश आहे .

मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणा – या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे . इयत्ता १२ वी नंतर वैद्यकीय ( MBBS , BAMS , BHMS , BDS , BUMS ) , MBA fot fi uso T यासारखे उच्च शिक्षण घेणा – या मागासवर्गीय विद्यार्थांना अर्थसहाय्य , मागासवर्गीय युवकांना परदेशातील उच्चशिक्षणासाठी अर्थसहाय्य या योजना असतील .पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दिव्यांगांना उपयुक्त साधनांसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहेत . दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतर darity ( MBBS , BAMS , BHMS , BDS , BUMS ) , MBA TOT 3fuiff Get परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य योजना , विशेष ( मतिमंद ) व्यक्तींचा सांभाळ करणा – या संस्थेस अथवा पालकांस अर्थसहाय्य या योजना असतील .

तर संत गाडगे महाराज दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना , पंडित दीनदयाळ उपाध्याय इयत्ता १ ली ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ आणि निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे . याशिवाय इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत इयत्ता १० वी मध्ये ८० ते ९ ० टक्के गुण मिळविणारे गुणवंत विद्यार्थी , इयत्ता ० वी मध्ये ९ ० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे गुणवंत विद्यार्थी , इयत्ता १२ वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे गुणवंत विद्यार्थी यांनाही आर्थिक लाभ दिला जाणार आहे . तसेच एचआयव्ही आणि एड्स बाधित मुलांचा सांभाळ करणा – या पालकांना आणि संस्थांना अर्थसहाय्य दिले जाईल . सर्व योजना महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी आहेत . अधिक माहितीसाठी नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्याशी ९ ८५०७२७३२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा .

Share this: