संततुकारामनगर येथे विवाहीत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ ; नव-यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीतील संततुकारामनगर येथे विवाहीत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी नव-यासह नऊ जणांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नवरा – विक्रांत सिध्दार्थ पवार , २ ) सासु लता सिध्दार्थ पवार ३ ) दिर सिध्दार्थ पवार , १ ) नवरा विक्रम विशाल त्यांचे ४ ) चुलत सासरा रमेश अण्णा पवार , ५ ) चुलत सासु सुजाता रमेश ६ ) चुलत नणंद धनश्री रमेश पवार , ७ ) चुलत नणंद – पवार , श्वेता रमेश पवार , ८ ) नव – याच्या आत्याचा मुलगा समीर शंकर सुर्यगंध , ९ ) नव – याच्या आत्याच्या मुलाची पत्नी – आरती समीर सुर्यगंध असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2008 ते 26 आॅक्टोबर 2020 पिंपरीतील संततुकारामनगर येथील राहत्या घरी यातील फिर्यादी महिला आणि आरोपी विक्रांत पवार हे पती – पत्नी असुन नऊ जणांनी संगणमत करुन फिर्यादी महिलेला वेळोवेळी शिवीगाळी दमदाटी व मारहाण करुन आरोपी सासु लता पवार, चुलत सासु सुजाता रमेश पवार, चुलत नणंद धनश्री रमेश पवार , चुलत नणंद – श्वेता रमेश पवार यांनी फिर्यादी महिला यांच्या संमत्तीशिवाय घरात घुसुन फिर्यादी महिलेला हाताने मारहाण , शिवीगाळी , दमदाटी करुन घरातील सामानाची तोडफोड करुन फिर्यादी महिलेस अंगावरच्या कपडयानिशी घरातुन बाहेर काढले.
आरोपी चुलत नणंद धनश्री रमेश पवार , चुलत नणंद – श्वेता रमेश पवार , नव – याच्या आत्याचा मुलगा समीर शंकर सुर्यगंध यांनी फिर्यादी महिलेच्या राहते घराला बाहेरुन कुलुपे लावुन फिर्यादी यांना घरामध्ये जाण्यास प्रतिबंध करुन फिर्यादी महिलेचा शारिरीक व मानसिक छळ केला. व आरोपी नव – याच्या आत्याचा मुलगा समीर शंकर सुर्यगंध, नव – याच्या आत्याच्या मुलाची पत्नी – आरती समीर सुर्यगंध यांनी इतर आरोपींना असे करण्यास भाग पाडले. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.