जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ;13 जणांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) पठारे वस्तीत असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा मारला . याबाबत जुगार खेळणाऱ्या 13 जणांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई बुधवारी ( दि . 25 ) करण्यात आली .
पोलीस शिपाई मारुती महादेव करचुंडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
अय्याज दाऊद शेख ( वय 43 , रा . कोंढवा , पुणे ) , रोहित भाऊसाहेब दाभाडे ( वय 26 ) , अमोल फकिरबा धुंबाळे ( वय 35 ) , साहिल रामदास दाभाडे ( वय 25 ) , स्वप्नील राजाराम दराके ( 28 ) , श्याम किसन भालेराव ( वय 27 ) , सतीश रामदास मेश्राम ( वय 30 ) , सचिन अनिल नाणेकर ( वय 32 ) , सुभाष ज्ञानेश्वर पवळे ( वय 36 ) , लक्ष्मण भिवा पाथरकर ( वय 30 ) , सुनील उर्फ सोन्या कोंडीबा मुंगसे , सतीश शिंदे , रोहित ( पूर्ण नाव माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपी नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी अय्याज शेख हा जुगार अड्डा चालवत होता . पठारे वस्ती ते लोहमार्ग नियोजित 90 फूट रोडच्या बाजूला सर्व आरोपी अंदर – बाहर नावाचा जुगार खेळत होते . याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी जुगार अड्यावर छापा टाकला . त्यात 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले . तर दोघेजण पळून गेले . आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल फोन , रोख रक्कम , जुगार खेळण्याचा चार्ट , पत्त्यांचे कॅट , दुचाकी – चारचाकी वाहने असा ऐवज जप्त केला आहे . अधिक तपास दिघी पोलीस करीत आहेत .