पिंपरी| वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या महिलेचा विनयभंग ;सिक्युरीटी गार्डला पोलिसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती(वायसीएम) रुग्णालयात नोकरी करणा – या सिक्युरीटी गार्डने पोलीस असल्याचे सांगत रूग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग केला आहे . ही सोमवारी ( दि .21 ) रात्री नऊच्या सुमारास घडली आहे . आरोपीला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत पिडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
अनिल मारूती स्वामी ( वय 47 , रा . खडकी बाजार , पुणे ) याला अटक करण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी महिला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत होती.अटक आरोपी हा रूग्णालयात सिक्युरीटी गार्डची नोकरी करतो . आरोपीने आपण पोलीस असल्याचे सांगत फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला . महिलेच्या आजारपणाचा फायदा घेऊन आरोपीने तिचा विनयभंग केला.दाखल फिर्यादी नुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.