गांधीनगर पुर्नवसन प्रकल्पाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत तहकूब; या प्रकल्पास स्थानिकांचा आहे विरोध
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी – चिंचवड महापानगरलिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीत पुनर्वसन योजना ( एसआरए ) राबविण्यात येणार आहे . त्यासाठी एकूण ६०८ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे . या प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प आराखड्यास ( डीपीआर ) अंतिम मान्यतेसह खर्चास मंजुरीचा प्रस्ताव आज (दि.20) रोजी सर्वसाधारण सभेसमोर येणार होता .मात्र पर्यावरण विषयक चर्चेच्या गदारोळात सर्वसाधारण सभेत हा विषय तहकूब करण्यात आला आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या.
या प्रकल्पाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली घोडेकर व भाजपच्या नगरसेविका साधना मळेकर यांनी मांडला आहे . त्यास शहर सुधारणा समितीने ९ डिसेंबर २०२० ला मंजुरी दिली आहे . या कामासाठी एम . एम . प्रोजेक्ट कन्सल्टंट यांच्या नियुक्तीस स्थायी एकूण समितीने २७ में २०२० ला मान्यता दिली आहे . कन्सल्टंटने प्रकल्पाचा डॉफ्ट कन्सेप्ट रिपोर्ट व डिजाईन १४ सप्टेंबर २०२० ला सादर केला आहे . या संदर्भात पालिका पदाधिकारी व गटनेत्यांसमोर १५ डिसेंबर २०२० ला सादरीकरण करण्यात आले . या प्रकल्पाचा डीपीआर व खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर आहे . या प्रकल्पात ११ मजली ५ आणि २० मजली ३ इमारतीमध्ये एकूण २ हजार ३०५ सदनिका बांधल्या जाणार असून , प्रकल्पाचा एकूण खर्च ५०७ कोटी ९ ० लाख इतका आहे . तर , जागामालकास १०० कोटी अदा केले जाणार आहेत .
गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पास स्थानिक नागरिकांचा विरोध
पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांचा या प्रकल्पास तीव्र विरोध आहे. येथील नागरिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प मनमानी पद्धतीने आणण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप येथील नागरिक वारंवार करित आहेत. विविध संघटना व राजकीय पक्षांनी देखील या प्रकल्पास विरोध केला आहे . जर स्थानिकांनी आपला विरोध शेवटपर्यंत असाच कायम राहीला तर या प्रकल्पास मंजुरी मिळते किंवा नाही हे पुढे होणा-या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे .
दरम्यान, पुनर्वसनासाठी ३०० चौरस फुट आकाराच्या १ हजार ८२ ९ सदनिका बांधल्या जाणार आहेत . तर , विक्रीसाठी ४५० ते ६०० चौरस फुट आकाराच्या ४७६ सदनिका व ३४४ व्यावसायिक गाळे असणार आहेत .