बातम्यामहाराष्ट्र

आप’ने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवण्यास केली सुरुवात; 13 जिल्ह्यात 96 ग्रामपंचायतीच्या जागा जिंकल्या

महाराष्ट्र (वास्तव संघर्ष) :नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्रदीपक पदार्पण केले. जवळजवळ ३०० पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आणि ग्रामीण महाराष्ट्रात एकुण 96 उमेदवार विजयी ठरले.

आप ने लातूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, हिंगोली, अहमदनगर, जालना, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील जागा जिंकल्या असून एकूण विजयापैकी ५०% स्त्रिया उमेदवार विजयी झाल्या आहेत.

“महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. लोक स्वराज्य, सामाजिक समानता आणि समान विचारसरणीच्या बाजूने बांधलेल्या एका पक्षाच्या मागे लोकांची पसंती मिळतआहे आहे हे योग्य असून सर्वांना संधी मिळणे गरजेचे आहे

हा खरोखर स्वच्छ राजकारणाचा विजय आहे आणि एक नवीन राजकीय संस्कृती आप पक्षाच्या माध्यमातून दिसून आली . आमच्या राजकीय विरोधकांनी साम दाम दंड व भेद अशी सर्व विभाजनकारी शस्त्रे वापरुनही आपचे उमेदवार विजयी झाले हे उल्लेखनीय आहे. आमचे नेते अरविंद केजरीवालजी यांचे नेतृत्व आणि आपच्या विकासाचा नीतीचा हा विजय आहे. राज्य पक्ष संयोजक श्री रंगा राचुरेजी आणि सह-संयोजक श्री किशोर माध्यम जी यांच्या नेतृत्वात कठोर परिश्रम घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्याचे मी अभिनंदन करतो.

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, निवडून आलेल्या प्रतिनिधी ग्रामपंचायतींमध्ये चांगले कार्य करू शकेल अशी परिवर्तनशील भूमिका व विकास या दोन्हीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी सक्षम आहेत. धनंजय शिंदे पुढे म्हणाले .”आप’ची कामगिरी आश्चर्यकारक आहे. हे आमचे स्थान सिद्ध करते आणि हे सिद्ध करते की देशभरातील लोक बदल आणि सुशासन मिळवण्याची तळमळ करत सहेत. आम्ही आमच्या सर्व मतदारांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो ज्यांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवला व जबाबदारी दिली”.

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रवक्ते प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या. “आमच्या दिल्लीतील सरकारने सुशासन म्हणजे काय हे दाखवून दिलेले असून आता दिल्ली विकास मॉडेलचे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच अनुकरण होईल असा विश्वास वाटतो.”

“ही केवळ एक सुरुवात आहे, प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि आम्ही राज्यभरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्याची आशा करतो

Share this: