क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भाजी विक्रेता निघाला खुनी ;तब्बल दहा वर्षानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- दहा वर्षांपूर्वी पिंपरीतील एका धुणीभांडी करणा-या महीलेच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एकाने अपहरण करून खून केला होता. मागील दोन महिन्यापूर्वी आरोपी मारूंजी येथे भाजी विक्री करीत असल्याची माहीती मिळाल्याने पिंपरी पोलीसांनी त्याला अटक केली आहे.  याप्रकरणी तब्बल दहा वर्षांनी खूनाचा गुन्हा दाखल झाला.

किशोर लक्ष्मण घारे ( वय 32 , रा . मु . पो . डाणे , ता . मावळ , जि . पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .

सविता सत्यवान लांडगे ( वय 52 , रा . बलदेवनगर , पिंपरी ) यांनी शनिवारी ( दि . 20 ) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी चांदणी सत्यवान लांडगे ( वय 22 ) हि हिंजवडी येथे कामाला होती . त्यावेळी तिचे आरोपी किशोर याच्या सोबत प्रेमसंबंध होते . ते दोघे लग्नही करणार होते . मात्र काही दिवसांपासून आरोपी किशोर हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता . त्यामुळे त्यांच्यात वादही झाला होता . दि .11 / 09 / 2011 रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपी किशोर घारे हा फिर्यादी यांचे घरी आला व चांदणीस म्हणाला’ चल आपण लग्न करूया’ असे म्हणुन चांदणी हीस मोटार सायकालवर बसवुन घेवुन गेला . त्यानंतर मुलगी चांदणी ही घरी आली नाही . म्हणुन फिर्यादी सविता यांनी चांदणी व किशोर घारे यांच्या मोबाईलवर फोन केला असता, त्या दोघांचेही फोन लागले नाही . आम्हाला वाटले गावाला जावुन राहीले असतील त्यामुळे मोबाईला रेंज नसल्याचे फोन लागत नसावे असे फिर्यादी यांना वाटले .


मात्र काही दिवसांनी आरोपी किशोर याचा फोन लागला असता , त्याने सांगितले की चांदणी हीचे बरोबर मी लग्न न केल्याने ती त्यादिवशी त्यास सोडुन निघुन गेली आहे . म्हणुन ती आज ना उदया घरी येईल म्हणुन फिर्यादी या वाट पाहत होत्या . परंतु सुमारे दोन वर्ष चांदणी हीचा काहीच पत्ता लागत नसल्याने फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस चौकी येथे जावुन दि .27 / 07 / 2013 रोजी फिर्यादी यांनी मुलगी चांदणी ही घरातुन गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली.

ज्यावेळी चांदणी ही घरातुन गेली तेव्हा तिच्या कानामध्ये 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे  टॉप्स व पायात चांदीच्या दोन पट्टया होत्या . मग मात्र फिर्यादी यांचा संशय बळावला त्यांनी चांदणी हीचा घातपात आरोपी किशोर यांनीच केल्याचा दावा करत.  मागील दोन महिन्यापूर्वी आरोपी किशोर मारूंजी येथे भाजी विक्री करीत असल्याचे माहीती काढत, फिर्यादी मारुंजी येथे जावुन किशोर यास भेटुन चांदणी बाबत विचारपुस केली असता . त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन चांदणी बाबत काहीएक माहीती देण्यास टाळाटाळ केली . त्यामुळे फिर्यादी यांची खाञी  झाली की आरोपी किशोर यानेच  त्यांची मुलगी चांदणी हीचा खून केला. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: