शास्तीकर बांधितांचा पालिकेवर विराट मोर्चा ; सत्ताधाऱ्यांना मोर्चामुळे भरणार धडकी
पिंपरी :-(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली राज्यातदेखील भाजपचीच सत्ता त्यात चिंचवडमध्ये भाजपचे आमदार आणि भोसरीत भाजप सहयोगी अपक्षआमदार असूनही भोसरी आणि शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतीत कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात शास्तीकर हटाव संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधीपक्षनेते दत्ताकाका साने यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर विराट मोर्चाचे आयोजन गुरुवार २५ जुलै २०१९ रोजी सकाळी १० वाजता केले आहे.
त्यामध्ये शास्तीकर शंभर टक्के माफ बद्दलचा प्रश्न हा सध्या शहराचा आणि बाधित नागरिकांचा जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न आहे सत्ताधारी या कळीचा मुद्दाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, सर्वसामान्यांना शास्तीकर माफ केला अशा खोट्या वल्गना करत आहेत तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी रेडझोन म्हाडा यांच्या जागेवरील घरे नियमित करण्यासाठीचा प्रश्न, कालबाह्य झालेला रिंगरोड रद्द करण्यासाठी अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या बाजूने त्यांचे प्रश्नमांडण्याकरीता हा लढा उभारला आहे, असे दत्ता साने म्हणाले
गेली १५ वर्षे राष्ट्रवादी सत्तेत असताना शहरात नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधेची वानवा नव्हती. अनधिकृत बांधकामे, रिंगरोड, पाणी टंचाई,शास्तिकर, कचरा समस्या, इ. समस्यांना वाचा फोडण्यासाठी विराट मोर्चाचे आयोजन केले आहे.महत्वाचे म्हणजे शास्तीकर हटाव संघर्ष समितीमध्ये सर्व शास्तीकर बांधितच नागरिक असल्याने शहरातील सत्ताधाऱ्यांना या मोर्चामुळे धडकी भरणार हे नक्की.