विरोधीपक्षनेता कार्यालय तोडफोड प्रकरण :येत्या पंधरा दिवसांत हल्लेखोर जेरबंद करणार? – पोलीस आयुक्त

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची दि. ७ रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता यातील आरोपी हे कुप्रसिद्ध रावण टोळीचे असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. त्यामुळे साने यांनी आपल्या आणि कुटुंबाच्या जीवीतास धोका असून चोवीस तास पोलीस संरक्षण द्यावे आणि सदरील तपास सिआयडीकडे देण्याची मागणी आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन यांच्याकडे केली आहे..

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांनी चिखली येथील दत्ता सानें च्या कार्यालयातील तोडफोडीच्या संदर्भात येत्या १५ दिवसांच्या आरोपींना तुरुंगात बंद करण्यात येईल असे आश्वासन आज दिले . गुरूवारी विरोधी पक्षनेते दत्ता काका सानें यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षीय शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांशी बोलले आणि त्यांनी एक निवेदन सादर केले .

यावेळी विलास लांडे ( माजीआमदार ), संजोग वाघेरे ( अध्यक्ष )राहुलदादा कलाटे (सेना गटनेते )सचिन चिखले ( मनसे गटनेते)अजित गव्हाणे संजयशेठ नेवाळे निलेश बारणे, कैलास बाबा बारणे, नाना काटे, श्याम लांडे, मयुर कलाटे, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, विशाल वाकडकर, (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष), वैशाली काळभोर, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, संगिता नानी ताम्हाणे आदि सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

Share this: