बाळंतपणानंतर दुधासाठी रडतोय कान्हा… आईला फुटतोय पान्हा ;महिला कर्मचा-यांकडे सरकारचे नाही लक्ष
दिपक साबळे..!
पिंपरी (वास्तव संघर्ष) : गरोदरपणात सगळ्याच महिलांना स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या रक्तामासात वाढत असलेल्या बाळाची जास्त काळजी असते. फक्त स्वतः नाही तर आपली रोगप्रतिकारकशक्ती आई आपल्या बाळासोबत शेअर करत असते.यामुळेच गरोदर महिला सगळयात जास्त आजारी पडत असतात. सध्याच्या काळात साथीचा रोग असलेला कोरोना व्हायरसचा धोका जगभरात थैमान घालत असताना शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या महिलांना कायद्यानुसार पगारी सहा महिने प्रसुती सुट्टी देण्यात येते. पण सहा महिन्यांची प्रसूती रजा संपून कार्यालयात रूजू झालेल्या व एक वर्षांच्या आतीत बाळ असलेल्या महिलांच्या सेवेसंदर्भात शासनाने अद्याप सेवा न लावण्यासंदर्भात शासन स्पष्ट संकेत नाही.
मात्र, बाळंतपणानंतर कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सरकारने बाळंतपणात सुट्या घेतलेल्या महिलांची माहीती कामाला रूजू होण्यासाठी मागवली आहे. यामध्ये पालिका – महापालिकेतील कर्मचारी,आरोग्य सफाई कर्मचारी, नर्स, शिक्षिका, पोलीस कर्मचारी, ईत्यादी आहेत.माञ अद्याप कोरोना व्हायरस च्या पाश्र्वभूमीवर नोकरी कुठे करायची? आणि आपल्या बाळाच्या दुधाचे काय? महिला कर्मचा-यांकडे सरकारचे लक्ष आहे की नाही? या संभ्रमात महिला कर्मचारी आहेत. तसेच याआधी काही महिला कर्मचारी बाळाला पाळणाघरात ठेवून सेवा करत होत्या माञ आता लाॅकडाऊनमध्ये पाळणाघर बंद आहे. तीकडे कान्हा दुधासाठी रडतोय परंतू दुध पाजण्यासाठी आईचा पान्हा फुटत असताना दिसून येतो.
नाव न सांगण्याच्या अटीवरुन एका कर्मचारी महीलेने आपली व्यथा वास्तव संघर्ष न्यूज समोर मांडली त्या म्हणाल्या , महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्हा सर्व शासकीय आणि प्रशासकीय महिलांना प्रसुतीनंतर कामावर रुजू होण्यासाठी आमची माहिती मागवली आहे. मात्र आमच्या आरोग्यासाठी सरकारचे काय धोरण आहे? लाॅकडाऊनच्या काळात प्रसुतीनंतर एखादी नर्स असो की शिक्षक कर्मचारी असौ त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या तान्ह्या बाळाचे काय होईल? याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे..
ज्या वेळेस आमच्या अंगावरच दुध आमच्या बाळाला द्यायचे असेल त्या वेळेस आमच्या मनात एकच भिंतीचे काहूर उठते की आम्हाला कोरोना झाला तर नसेल.. एक माझी मैत्रिण आहे ती संध्या प्रसुतीनंतर कामाला गेली होती ती म्हणते ‘घरी आल्याआल्या मूल बिलगते , अंगावरच्या दुधासाठी हट्ट घरते .
चार तासांचा प्रवास आणि बारा तास काम केल्यावर आपल्याला करोनाची लागण झालेली नाही ना , आपल्यामुळे तानच्या मुलाला संसर्ग होणार नाही ना , ही भीती घरात शिरताना मन अस्वस्थ करून जाते . यावर उपाय म्हणून मी मुलाचं दूधच तोडलं . मुलाला सवय व्हावी आणि अध्यांवर पान्हा बंद केल्याचा मला त्रास होऊ नये म्हणून कामावरून घरी आल्यावर मी माझ्या मुलाला जवळही घेत नाही .तसेच बाळाला वरचे दुध देण्यात येणार आहे.
गरोदर असलेल्यांप्रमाणेच बाळंतपणानंतर कर्तव्यावर रुजू झालेल्या महिला अधिकारी-कर्मचारी यांना सुट्टी जाहीर करावी किंवा अन्य सोयीसुविधा पुरवाव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे . बाळंतपणात आईला होणार ञास पुढे बाळंतपणानंतर तान्ह्या मुलांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने पालिका कर्मचारी,नर्स, शिक्षिका, पोलीस कर्मचारी, ईत्यादीना कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे ञास होऊ नये यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.